हिवाळ्यात टाचांना भेगा का पडतात? कारणं, लक्षणं आणि सोपी घरगुती काळजी

Introduction:-

हिवाळ्यात टाचांना भेगा का पडतात?

हिवाळ्यात टाचांना भेगा का पडतात?

हिवाळा सुरू झाला की अनेकांना टाचांना भेगा पडण्याची समस्या त्रास देते. लहान मुलांचे ओठ फाटणे आणि मोठ्यांच्या टाचा दुखणे—हे सर्व थंड वातावरणात अधिक जाणवते. सुरुवातीला ही समस्या सामान्य वाटू शकते, परंतु वेळेत काळजी न घेतल्यास भेगा खोल होऊन वेदनादायक होतात. थंड हवा लागली की ही वेदना आणखी वाढते.

मग हिवाळ्यातच टाचांना भेगा का पडतात? आणि त्यापासून बचाव कसा करायचा? चला सविस्तर जाणून घेऊया.

हिवाळ्यात टाचांना भेगा का पडतात? मुख्य कारणं:

त्वचारोगतज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात त्वचेतील ओलावा जलद गतीने कमी होतो. पायांवरील त्वचा नैसर्गिकरित्या कोरडी असल्याने टाचा सर्वाधिक प्रभावित होतात.

१) पायांवर तेल ग्रंथी कमी असणे:

पायांच्या त्वचेत तेल ग्रंथी खूप कमी असतात. त्यामुळे ती आधीच कोरडी असते.
हिवाळ्यात या ग्रंथींची कार्यक्षमता कमी होते आणि त्वचेमधील ओलावा हरवतो, परिणामी भेगा पडतात.

२) वय वाढल्यावर त्वचेची लवचिकता घटते

वयानुसार त्वचा पातळ आणि कोरडी होत जाते.शरीरात तयार होणाऱ्या नैसर्गिक तेलाचं प्रमाण कमी झाल्यानं टाचांवर दाब वाढतो आणि त्वचा फुटू लागते.

३) मधुमेह, एक्झिमा, सोरायसिससारखे आजार

सोरायसिस, बुरशीजन्य संसर्ग, मधुमेह, थायरॉईड किंवा एक्झिमामुळेही टाचांची त्वचा लवकर कोरडी पडते आणि भेगा निर्माण होतात.

४) हिवाळ्यात कमी पाणी पिणं

थंडीमध्ये तहान लागत नाही म्हणून अनेकजण पाणी कमी पितात.यामुळे शरीराचा ओलावा घटतो आणि त्वचा रुखरुखीत होते.

५) गरम पाण्याने आंघोळ

जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेतील नैसर्गिक तेल नष्ट होते,यामुळे टाचा अधिक कोरड्या होतात.

६) पाय स्वच्छ न धुणे किंवा नीट न सुकवणे

आंघोळीनंतर टाचा ओल्या राहिल्यास त्वचा अधिक कमजोर होते आणि भेगा पडतात.

भेगा पडल्यावर कोणती समस्या जाणवते?

  • टाचांमध्ये तीव्र वेदना
  • चालताना त्रास
  • झोपताना बेडशीट लागले तरी वेदना
  • खोल भेगांमुळे रक्तस्त्राव किंवा पू
  • सार्वजनिक ठिकाणी जाण्यास संकोच

हिवाळ्यात महिलांमध्ये ही तक्रार जास्त दिसून येते, तर खूप चिखलात चालणाऱ्या लोकांनाही हा त्रास अधिक होऊ शकतो.

हिवाळ्यात टाचा भेगांना कशी काळजी घ्यावी?

त्वचारोगतज्ज्ञ सुचवलेल्या काही सोप्या आणि प्रभावी टिप्स:

१) दररोज कोमट पाण्याने पाय धुवा

खूप गरम पाण्याचा वापर करू नका.कोमट पाणी त्वचा मऊ ठेवतं आणि भेगा कमी करते.

२) आंघोळीनंतर क्रीम किंवा तेल लावा

नारळाचे तेल,ग्लिसरीन,पायांसाठीचे मॉइश्चरायझर,लोशन यामुळे टाचा मऊ राहतात आणि भेगा वाढत नाहीत.

३) शरीराला पुरेसं पाणी द्या

हिवाळ्यातही दिवसाला ७–८ ग्लास पाणी प्या.त्वचेची ओलावा टिकवण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे.

४) पायांवर दिवसातून दोनदा मॉइश्चरायझर

सकाळी आंघोळी नंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी मॉइश्चरायझर लावा.

५) रात्री मोजे घाला

मधुमेही किंवा वृद्ध व्यक्तींनी कापडी मोजे घालावेत.यामुळे मॉइश्चर लॉक होतं आणि भेगा कमी होतात.

६) आहारात ओमेगा फॅटी अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन्स

अक्रोड, जवसाच्या बिया, बदाम,व्हिटॅमिन C असलेली फळं,गाजर, हिरव्या भाज्या, लिंबू हे पोषक तत्त्व त्वाला नैसर्गिक ओलावा देतात.

डॉक्टरांचा सल्ला केव्हा घ्यावा?

  • भेगांतून रक्त येत असेल
  • पू दिसत असेल
  • वेदना वाढत असेल
  • मधुमेहामुळे भेगा भरत नसतील
  • अशा वेळी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे.

थोडक्यात

हिवाळ्यात टाचांना भेगा पडणे ही सामान्य पण त्रासदायक समस्या आहे.
योग्य काळजी, योग्य मॉइश्चरायझर, पुरेसं पाणी आणि संतुलित आहार यामुळे तुम्ही ही समस्या सहज टाळू शकता.
दररोज काही मिनिटांची काळजी घेतल्यास टाचा निरोगी आणि मऊ राहतात.

https://www.thefeetpeople.com.au/symptoms-we-treat/cracked-heels/

Hot or cold water in winter:थंडीत अंघोळ गरम पाण्याने करावी की थंड पाण्याने?

Leave a Comment