Pneumonia in children :- लहान मुलांमधला Pneumonia आताच ओळखा.

Pneumonia:

लहान मुलांमध्ये Pneumonia हा असा आजार आहे,जो लवकरात लवकर निदान होण गरजेच असत नाहीतर तो जीवघेणा ठरू शकतो. लहान मुलांमध्ये कॉमन असणारा पण फुफुसांचा गंभीर असा हा आजार आहे.

बालरोगतज्ज्ञ डॉ. सीमा देशमुख सांगतात की न्यूमोनियाचे प्रारंभिक निदान आणि योग्य अँटिबायोटिक उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. अनेक वेळा पालक ताप आणि खोकल्याकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे फुफ्फुसांमध्ये संसर्ग वाढतो. त्यामुळे लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लसीकरणाचे पालन, घरातील स्वच्छता, पोषक आहार आणि प्रदूषणापासून संरक्षण हीच न्यूमोनियावरची खरी ढाल आहे.

लहान मुलांमध्ये Pneumonia होण्याची कारणे :

न्यूमोनिया विषाणू,जिवाणू ह्यांच्या किंवा बुरशीजन्य संक्रमनामुळे होतो.लहान मुलांना कधी कधी अपुरे लसीकरण,कुपोषण,दुर्बल प्रतिकारशक्ती ह्या कारणामुळे लहान मुलांमध्ये हा आजार बळावतो.श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला, ताप, छातीत दुखणे, अन्न न घेणे, जलद श्वासोच्छ्वास ही प्राथमिक लक्षणे आहेत.

Pneumonia

लहान मुलांच्यात ही लक्षणं दिसली की लगेच डॉक्टर गाठा.

  • सारखा खोकला येणे.
  • थंडी,ताप वाजुन येणे.
  • थकवा आणि अशक्तपणा येणे.
  • भुक मंदावणे किंवा उलट्या होणे.

Disclaimer:- ह्या लेखामध्ये दिली गेलेली माहिती शैक्षणिक उद्देशाने सांगितली गेलेली आहे.तरीही कोणताही व्यायाम किंवा उपचार करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Heart Attack होण्याच्या आधी डाव्या हाताला का दुखायला सुरुवात होते?

Side effects of drinking tea : चहा हृदयाच्या ठोक्यांना करू शकतो कमी.

https://www.esakal.com/sci-tech/how-to-complete-ayushman-bharat-e-kyc-or-lose-5-lakh-free-treatment-ayushman-bharat-app-update-ssg2

Leave a Comment