International Epilepsy Day: Epilepsy/फिट्स येण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय?

साधारणपणे फिट्स येण म्हटलं की आपल्यासमोर एक चित्र उभ राहत,ज्यामध्ये एखादा व्यक्ती असतो आणि तो जमिनीवर थरथरत पडलेला असतो, त्याच्या तोंडाला फेस आलेला असतो,असं साधारणपणे चित्र आपल्या डोळ्यासमोर येत. Epilepsy/फिट्स हा आजार जगातल्या लाखो लोकांना भेडसावतो, हा आजार होताना तो एखाद्याचं जात,लिंग,वय पाहत नाही, हा आजार कोणालाही होऊ शकतो.

आज इतक्या वर्षानंतर सुद्धा Epilepsy म्हणजेच फिट्स याबद्दल समाजात अनेक समज गैरसमज आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही लोकांना हा जादूटोणा, भूत प्रेत या असल्या प्रकारांमुळे हा आजार होतो असंच वाटतं, पण हा पूर्णपणे लोकांचा गैरसमज आहे.

मित्रांनो Epilepsy/फिट्स हा आजार जरी पूर्णपणे बरा होत नसला हे खरं असलं, तरीही वैद्यकीय कारणाने होणारा हा आजार, याच्यावर योग्य औषध उपचार, आपल्या लाइफस्टाईल मध्ये जर बदल केले आणि रेग्युलर तपासण्या केल्या तर हा आजार पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येऊ शकतो हेही तेवढच खरं आहे.

Epilepsy/ फिट्स म्हणजे काय असतं?


मेंदू मधील इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी मध्ये अचानक झालेल्या बिघाडामुळे होणारा हा आजार आहे.

Epilepsy/ फिट्स येण्याची कारणे कोणती:

जेव्हा आपल्या मेंदूला दुखापत होते असल्या केसेस मध्ये Epilepsy/फिट्स होण्याची जास्त शक्यता असते. तर काही लहान मुलांमध्ये जन्मताच हा आजार होऊ शकतो, त्यामागे मेंदूच्या विकासातील काही त्रुटींमुळे किंवा काही केसेस मध्ये फॅमिली मधेच पिढीजात हा आजार असू शकतो. शिवाय थकवा, स्ट्रेस, कमी झोप घेणे,सिगरेट, दारू यासारख्या व्यसनांमुळे सुद्धा एखाद्या व्यक्तीला फिट्स येऊ शकतात.

Epilepsy/ फिट्स निदान कसं होत?

Epilepsy/ फिट्स यामध्ये तज्ञ डॉक्टर तुम्हाला ईईजी,रक्त तपासण्या,MRI किंवा CT Scan सारख्या टेस्ट करायला लाऊ शकतात. सोबत काही फिजिकल टेस्ट करून सुद्धा ह्याची तपासणी केली जाऊ शकते.

Epilepsy/ फिट्सची लक्षणे:

Epilepsy/ फिट्स ह्यात साधारणपणे तीन प्रकार पडतात.

1) generalize seizures:


ह्या प्रकारात पेशंट अचानक पडू शकतो, दात घट्ट केले जाऊ शकतात, ओठांना निळसरपणा येऊ शकतो,तोंडामध्ये फेस येऊ शकतो अशा काही घटना होऊ शकतात.

2) Absence Seizures:

ह्या प्रकारामध्ये पेशंट डोळ्याची पापणी सुद्धा न हलवता, काही सेकंदासाठी किंवा मिनिटांसाठी स्तब्ध राहतो, त्या व्यक्तीचं बोलणं किंवा काम करणं जागेवर थांबतं आणि हा आजार शक्यतो लहान मुलांमध्ये दिसतो.

3) Focal Seizures:

या प्रकारामध्ये शरीराचा ठराविक भाग थरथर कापतो शरीरातून विचित्र वास किंवा आवाज जाणवतो आणि अशा व्यक्तीमध्ये अचानक भीती किंवा गोंधळ निर्माण होतो.ह्यामध्ये व्यक्तीच्या विचार करण्याच्या,व्यक्त होण्याच्या किंवा सेन्सेशन वर परिणाम होतो.

https://internationalepilepsyday.org/

Epilepsy/ फिट्स मध्ये काय काळजी घ्यावी:

काय करावं:

फिट्सचा झटका आल्यावर पेशंटला खाली आडवं झोपवाव आणि त्याच्या डोकं खाली उशी किंवा एखादं मऊ कापड द्यावं. त्या पेशंटच्या अंगावर असलेले कपडे सैल करावे आणि शक्यतो मानेभोवती चे कपडे सैल करावे, त्याच्या व्यक्तीच्या जवळ कोणत्याही टोकदार, धारदार वस्तू असतील तर त्या व्यक्तीपासून लांब कराव्या.

काय करू नये:

फिट्स आल्यानंतर त्या व्यक्तीच्या आजूबाजूला असलेल्या लोकांना काय करावं हे सुचत नाही हे साहजिकच आहे परंतु अशावेळी घाबरून न जाता त्या पेशंटला पाणी किंवा औषध असलं काहीही देण्याचा प्रयत्न करू नये. त्या रुग्णाला जोरात दाबण्याचा प्रयत्न करणं असले प्रकार करू नये.

Epilepsy/ फिट्स उपचार:

फिट्स हा आजार जरी कायमचा बरा होत नसला तरी आपण व्यवस्थित झोप घेणे, स्ट्रेस कमी घेणे,दारू,सिगरेट, व वेळोवेळी औषधोपचार केल्याने थोडक्यात आपल्या जीवनशैली, आहार, व्यायाम आणि डॉक्टरांचा वेळोवेळी सल्ला आणि उपचार घेऊन यावर बऱ्यापैकी आपण मात करू शकतो.ह्यासाठी त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांनी मित्र परिवाराने अशा रुग्णांना मानसिक आधार देणं खूप गरजेचं असतं.

Disclaimer:- ह्या लेखामध्ये दिली गेलेली माहिती शैक्षणिक उद्देशाने सांगितली गेलेली आहे.तरीही कोणताही व्यायाम किंवा उपचार करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Side effects of drinking tea : चहा हृदयाच्या ठोक्यांना करू शकतो कमी.

Heart Attack होण्याच्या आधी डाव्या हाताला का दुखायला सुरुवात होते?

Pneumonia in children :- लहान मुलांमधला Pneumonia आताच ओळखा.

Leave a Comment