Introdcution:

winter
मित्रांनो नुकताच हिवाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळ्याबरोबर सुरू होते ती म्हणजे कडाक्याची थंडी. सगळ्यात आधी तर या थंडीमध्ये अंथरुणाच्या बाहेर पडू वाटत नाही आणि पडलं तर पुढचा प्रश्न असतो आंघोळ करावी की नाही कारण इतक्या कडाक्याच्या थंडीमध्ये आंघोळ करणं म्हणजे एक मोठी परीक्षाच आहे.
ह्यानंतर हिवाळ्यामध्ये प्रत्येकाला प्रश्न पडतो तो म्हणजे हिवाळ्यामध्ये अंघोळ थंड पाण्याने करावी का गरम पाण्याने. साधारणपणे लोकांच म्हणणं असतं की, थंड पाण्याने अंघोळ करणं चांगलं असतं तर काही लोक असं म्हणतात की आपली गरम पाण्याने केलेली अंघोळ बरी, त्यामुळे प्रश्न असा पडतो की हिवाळ्यामध्ये नक्की अंघोळ करावी का नाही आणि केलीच तर नक्की कोणत्या पाण्याने करावी.
Cold Shower Or hot shower in winter:

हिवाळ्यामध्ये गरम पाण्याने अंघोळ केली तर काय होईल?
थंडीच्या दिवसात बरेच लोक गरम पाण्याने अंघोळ करण्याला प्राधान्य देतात पण तज्ञ असे म्हणतात की गरम पाण्याने अंघोळ केल्यामुळे त्वचेवरील नैसर्गिक संरक्षणात्मक जो थर असतो त्याला नुकसान पोहोचू शकत. तज्ञ डॉक्टर अंजू झा असं सांगतात की गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर त्वचेवर कोरडेपणा येऊ शकतो. बीबीसीच्या एका रिपोर्टमध्ये अपोलो हॉस्पिटलचे त्वचारोग तज्ञ डॉक्टर डी.एम.महाजन म्हणतात की थंडीत आंघोळ करताना पाणी गरम असलच पाहिजे पण तुम्हाला थंडी वाजणार नाही इतकच ते गरम पाहिजे जास्त गरम नको.
त्वचारोग तज्ञ डॉक्टर अंजू झा पुढे सांगतात की जर त्वचेवर आधीच कोरडेपणा असेल आणि तुम्ही जास्त गरम पाण्याने अंघोळ केली तर त्वचारोग आणि एक्झिमा होण्याची शक्यता वाढते. त्वचारोग ही समस्या सामान्य आहे ज्यामुळे खाज सुटू शकते, त्यामुळे त्वचा लाल सुद्धा पडू शकते.
हिवाळ्यामध्ये थंड पाण्याने आंघोळ केली तर काय होईल?
आता गरम पाण्याने अंघोळ करण्याचे परिणाम तुम्ही जाणून घेतले असतील तर सामान्यपणे तुम्हाला सुद्धा वाटण की हिवाळ्यामध्ये थंड पाण्याने चांगलं केले पाहिजे पण असं नाहीये. कडाक्याच्या थंडीमध्ये थंड पाण्याने आंघोळ केली तर त्याचा सुद्धा उलट त्रास आपल्याला होऊ शकतो. तज्ञ डॉक्टर असं सांगतात की अचानक आपल्या त्वचेवर थंड पाणी पडल्यावर आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात त्यामुळे आपला रक्त दाब वाढू शकतो आणि हृदयाचे ठोके अचानक वाढायला सुरुवात होते.
ज्या व्यक्तींना आधीपासूनच हृदयरोग हाय ब्लड प्रेशर किंवा हृदयाशी संबंधित कोणताही आजार आहे अशा व्यक्तींनी अचानक थंड पाणी घेणे शक्यतो टाळावं, नाहीतर हार्ट अटॅकचा किंवा ब्रेन स्ट्रोकचा धोका जास्त वाढू शकतो.
मंग हिवाळ्यामध्ये नक्की कोणत्या पाण्याने अंघोळ करावी?
या सगळ्या तज्ञांच्या म्हणण्यानुसार कडक गरम पाण्याने केली तर आपल्याला त्वचेचे आजार होऊ शकतात आणि थंडीच्या दिवसात थंड पाण्याने अंघोळ केल्यावर हृदयाचे आजार होऊ शकतात, त्यामुळे ना गरम ना थंड सरळ सरळ कोमट पाण्याने अंघोळ करणं कधीही चांगलं,मंग तो हिवाळा असो नाहीतर उन्हाळा असो.
Disclaimer:- ह्या लेखामध्ये दिली गेलेली माहिती शैक्षणिक उद्देशाने सांगितली गेलेली आहे.तरीही कोणताही व्यायाम किंवा उपचार करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
International Epilepsy Day: Epilepsy/फिट्स येण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय?
Pneumonia in children :- लहान मुलांमधला Pneumonia आताच ओळखा.
Side effects of drinking tea : चहा हृदयाच्या ठोक्यांना करू शकतो कमी.