Introduction:

sleep.
सध्याची लाइफ स्टाईल मित्रांनो किती फास्ट झाली आहे हे वेगळं सांगायची गरज नाही, ह्या बदलत्या लाईफस्टाईल बरोबरच आपले झोपेचे रुटीन सुद्धा बदललेले आहे. तुम्हीच विचार करून बघा की आपण किती तासांची झोप घेतो. कामाचा तर टेन्शन असतच पण काम झाल्यानंतर सुद्धा मोबाईल मध्ये रिल्स पाहण्यातच बऱ्याच जणांचा वेळ जातो. यामुळे आपली स्लिप सायकल जी असते ती पूर्णपणे बिघडते आणि इथूनच शरीरातील वेगवेगळ्या आजारांना सुरुवात होते.
सहा तासांपेक्षा कमी झोप आपल्या शरीरा मध्ये पुढील बदल घडू शकते

१) शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते:
मित्रांनो झोप ही आपल्या शरीरातल्या रोगप्रतिकारक शक्तीशी डायरेक्ट निगडित असते. कमी झोप घेण्याचा परिणाम आपल्या शरीरातल्या रोगप्रतिकारक सोबतच स्ट्रेस मॅनेज करणारे जे जनुके (genes) ह्यावर होतो.ह्याचा परिणाम म्हणून आपले शरीर हळू हळू कमकुवत व्हायला लागते.6 तासांपेक्षा जास्त झोप घेतल्यामुळे आपलं शरीर रिकव्हरी मोडमध्ये जातं ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा सुधारते.
२) अकाली मृत्यूचा धोका:
काही रिसर्च नुसार असेही समोर आलेला आहे की जी लोक सहा तासांपेक्षा कमी झोप घेतात त्यांच्यामध्ये अकाली मृत्यूचा धोका हा १५ टक्क्यांनी जास्त असतो.

३) मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम:
आपल्या कमी झोप घेण्याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर होत असतो. आपल्या कमी झोपेमुळे मेंदू कमकुवत होतो ज्याने आपली एकाग्रता, विचार करण्याची क्षमता या सगळ्यांवर परिणाम होतो.कमी झोपेमुळे लोकांमध्ये चिडचिडेपणा,स्ट्रेस, डिप्रेशन सारख्या समस्या निर्माण होतात.

४) वजन आणि भूक ह्यावर होतो परिणाम:
काही स्टडीज नुसार असं समोर आलेला आहे की जी लोक सहा तासांपेक्षा जास्त कमी झोप घेतात, त्यांच्यामध्ये टाईप 2 डायबिटीस होण्याचं प्रमाण वाढत.कमी झोपेमुळे स्ट्रेस वाढतो ज्यामुळे बीएमआय वाढतो आणि सोबत वाढतो तो लठ्ठपणा.
५) शरीरातल्या अवयवांवर परिणाम:
कमी झोपेचा परिणाम थेट आपल्या शरीरातील वेगवेगळ्या अवयवांवर होत असतो, जेणेकरून आपल्याला हृदयरोग, किडनी विकार, ब्लड प्रेशर, स्ट्रोक ओबेसिटी ह्यासारखे प्रॉब्लेम निर्माण होतात त्यामुळे कमीत कमी ६ तासांपेक्षा जास्त झोप घेणे खूप गरजेचे आहे.

मित्रांनो ह्या बिझी लाईफस्टाईल मध्ये काम तर होतच राहतील पण आपल्या शरीराची झोप होणं सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, कारण ‘सिरसलामत तो पगडी पचास’ हे म्हणतात ते उगीच नाही. आपलं शरीर असेल तर बाकीच्या गोष्टी आहेत त्यामुळे जर तुम्ही सहा तासांपेक्षा कमी झोप येत असाल,तर हे तुमच्या शरीरासाठी खूप घातक आहे. सहा तासांपेक्षा जास्त झोप घ्या. मोबाईल,रील्स, स्ट्रेस कमी घ्या जेणेकरून आपले शरीर निरोगी राहील.
Disclaimer:- ह्या लेखामध्ये दिली गेलेली माहिती शैक्षणिक उद्देशाने सांगितली गेलेली आहे.तरीही कोणताही व्यायाम किंवा उपचार करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
Hot or cold water in winter:थंडीत अंघोळ गरम पाण्याने करावी की थंड पाण्याने?
International Epilepsy Day: Epilepsy/फिट्स येण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय?
https://my.clevelandclinic.org/health/diseases/23970-sleep-deprivation
