sherlyn chopra breast surgery: ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकल्याने काय होऊ शकत?

INTRODUCTION:

sherlyn chopra breast surgery

https://www.instagram.com/_sherlynchopra_/?igsh=ZGVmc2o5aG9vNDc4#

सोशल मीडिया स्टार sherlyn chopra ने नुकताच instagram वर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तिने तिच्या breast implant remove surgery बद्दल सविस्तरपणे सांगितलेलं आहे. ह्या breast implant मुळे sherlyn chopra ला पाठ दुखी. मान दुखी आणि छातीवर ओझे असल्यासारखं वाटत होतं याचं कारण म्हणजे तिचे हेवी ब्रेस्ट इम्प्लांट. या कारणांमुळे तिने आपले breast implant काढून टाकलेले आहेत.

Breast Implant Surgery ह्या गोष्टी आता समाजात काही नवीन राहिलेल्या नाहीयेत. महिला आपलं शरीर आकर्षक दिसण्यासाठी अशा प्रकारच्या सर्जरीच करत राहतात परंतु ह्या सर्जरीनंतर किंवा breast implant काढून टाकल्यानंतर सामान्यपणे महिलांना काय त्रास होऊ शकतो हे आपण या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत.

काय समस्या येऊ शकतात?

Breast Implant Surgery मध्ये सगळ्यात पहिल्यांदा प्रॉब्लेम येऊ शकतो तो म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर Breast मध्ये इन्फेक्शन होणे, सर्जरी दरम्यान पेशंटला अनेस्थिशिया दिला जातो आणि त्याचे वेगवेगळे चॅलेंजेस असतात.
तज्ञांच्या मते सर्जरीनंतर स्तनांच्या आजूबाजूची स्किन सेन्सिटिव्ह होणे किंवा सेन्सेशन कमी होणे अशा प्रकारच्या समस्या होऊ शकतात. शिवाय ज्या स्तनांचे इम्प्लांट काढलेले आहेत त्यांचा आकार सुद्धा बदलला जाऊ शकतो.

रिकव्हरीला किती वेळ लागतो:

तज्ञ डॉक्टरांच्या मते सर्जरी झाल्यानंतर कमीत कमी 48 ते 72 तासांपर्यंत सूज असू शकते. पण पुढच्या एक ते दोन आठवड्यात हळूहळू हालचाली करू शकता आणि एक महिन्यानंतर तुम्ही ऑफिस मध्ये बसून काम सुद्धा करू शकता. परंतु वजन उचलण्यासारखे काम करायला तुम्हाला वेळ लागू शकतो.

ह्या गोष्टी लक्षात असू द्या:

सगळ्यात आधी तर महिलांनी लक्षात घेतलं पाहिजे की ह्या अशा प्रकारच्या सर्जरीज करताना आपण आपल्या सर्जनशी मोकळेपणानं बोललं पाहिजे. उगाच अवास्तव अपेक्षा ठेवू नयेत. ब्रेस्ट रिमुव्हल सर्जरी झाल्यानंतर शरीराचा आकार पुन्हा नॉर्मल सारखा होऊ शकतो. थोडक्यात प्लांट मुळे जो आकर्षकपणा आलेला होता तो आकर्षकपणा कमी होऊ शकतो तर हे वास्तव सुद्धा मान्य केलं पाहिजे आणि काहीही समस्या आल्यास आपल्या डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्यासोबत सल्लामसलत करूनच गोळ्या औषध घ्याव्यात.

Disclaimer:- ह्या लेखामध्ये दिली गेलेली माहिती शैक्षणिक उद्देशाने सांगितली गेलेली आहे.तरीही कोणताही व्यायाम किंवा उपचार करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Male Breast Cancer: पुरुषांमध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरच प्रमाण का वाढतंय?

Pneumonia in children :- लहान मुलांमधला Pneumonia आताच ओळखा.

https://www.mayoclinic.org/tests-procedures/mastectomy/about/pac-20394670

Leave a Comment