Winter Hair Care: हिवाळ्यात डँड्रफ का वाढतो? अंघोळ करताना ह्या 7 चुका टाळा!

Introduction:

Winter Hair Care:हिवाळा सुरू झाला की त्वचा, ओठ, चेहरा तर कोरडे पडतातच पण सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे डँड्रफ. खांद्यावर पडणारे पांढरे कण, सततची खाज आणि केसांमध्ये होणारी जळजळ यामुळे आत्मविश्वासावरही परिणाम होतो. पण हे नेमकं होतं का? आणि अंघोळ करताना कोणत्या चुका आपल्याकडून नकळत होतात? चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया.

Winter Hair Care

हिवाळ्यात डँड्रफ का वाढतो?

हिवाळ्यात वातावरणातील नैसर्गिक आर्द्रता खूप कमी होते. यामुळे स्कॅल्पची मोइस्चर बॅरियर कमकुवत होते आणि त्वचा कोरडी पडायला लागते.त्यात घरातील हीटर, थंड वारा आणि आपल्या रोजच्या सवयीतील छोट्या चुका मिळून डँड्रफ झपाट्याने वाढतो.

हिवाळ्यात डँड्रफ वाढण्याची मुख्य कारणे:

1) खूप गरम पाण्याने अंघोळ करणे:

गरम पाणी शरीराला रिलॅक्स करते, पण केसांसाठी ते हानिकारक,ते स्कॅल्पचे नैसर्गिक तेल काढून टाकते आणि केस अतिशय कोरडे होतात.

2) केस कमी धुणे:

थंडीमुळे बऱ्याच जणांचे शॅम्पूकडे दुर्लक्ष होते.केस धुतले नाहीत की तेल, घाम आणि धूळ साचते. त्यामुळे फंगसला वाढण्यासाठी परफेक्ट वातावरण मिळते.

3) चुकीचे तेल वापरणे:

हिवाळ्यात जड तेल वापरल्याने ओलावा तर वाढतोच, पण स्कॅल्पवरील फंगसही वाढतो.यामुळे जाड फ्लेक्स आणि खाज अधिक जाणवते.

4) दिवसभर टोपी घालणे:

हिवाळ्यात डोकं झाकणं गरजेचं आहे, पण सतत टोपी घातल्याने आत गरमी आणि घाम तयार होतो.
ही परिस्थिती फंगससाठी अगदी योग्य असते.

5) रूम हीटरचा जास्त वापर:

हीटर खोलीला उबदार करतो, पण स्कॅल्पला खूप कोरडे बनवतो.यामुळे पापुद्रे वाढतात.

6) सतत हेअर स्टाइलिंग आणि हीट टूल्स

ब्लो ड्राय, स्ट्रेटनर, कर्लर यामुळे स्कॅल्पमधून नमी कमी होते.
केस तुटणे, कोरडेपणा आणि डँड्रफ अशा तक्रारी वाढतात.

7) स्कॅल्पची योग्य कंडिशनिंग न करणे:

आपण फक्त केसांच्या लांबीवर कंडिशनर लावतो, पण स्कॅल्पही मॉइस्चरची मागणी करतो.स्कॅल्प कोरडा राहिला की डँड्रफ वाढणे अगदी स्वाभाविक.

8) कमी पाणी पिणे:

हिवाळ्यात पाणी कमी प्यायची सवय होते. पण शरीर डिहायड्रेट झालं की स्कॅल्पवरही त्याचा परिणाम होतो आणि त्वचा सोलू लागते.

9) व्हिटॅमिन D ची कमतरता:

थंडीमुळे सूर्यप्रकाश कमी मिळतो.यामुळे व्हिटॅमिन D लेव्हल कमी होऊन स्कॅल्पची इम्युनिटी कमी होते आणि इन्फेक्शन वाढते

हिवाळ्यात डँड्रफ कसा कंट्रोल करावा? (Winter Dandruff Control Tips)

1)योग्य Anti-Dandruff Shampoo वापरा:

Ketoconazole, Zinc Pyrithione किंवा Salicylic Acid असलेले शॅम्पू उपयुक्त.

2)गार नाही आणि गरमही नाही – फक्त कोमट पाणी:

स्कॅल्पचे नैसर्गिक तेल टिकून राहते.

3)आठवड्यात 2–3 वेळा केस धुवा:

जास्त धुणे आणि खूप कमी धुणे दोन्हीही चुकीचे.

4)हलके, Non-Sticky ऑइल वापरा:

जसे की बदाम तेल, जोजोबा तेल किंवा आर्गन तेल.

6) पाण्याचे प्रमाण वाढवा:

दररोज 2–3 लिटर पाणी प्या.

7)सूर्यप्रकाशात 10–15 मिनिटे बसा:

व्हिटॅमिन D मिळते आणि स्कॅल्पची इम्युनिटी वाढते.

हिवाळ्यात डँड्रफ वाढणे ही खूप सामान्य गोष्ट आहे, पण योग्य केअर घेतली तर ती सहज थांबवता येते.आंघोळ करताना होणाऱ्या छोट्या चुका सुधारल्या, स्कॅल्पला मॉइस्चर दिले आणि पाणी पुरेसे प्यायलात तर तुम्ही संपूर्ण सीझनभर डँड्रफ-फ्री, हेल्दी आणि स्मूथ केस एन्जॉय करू शकता.

https://www.drhealthclinic.com/winter-dandruff-woes-why-it-gets-worse-and-how-to-manage-it/

Kidney failure symptoms:किडनी खराब होण्याच्या आधी शरीरात दिसतात हे संकेत

Pneumonia in children :- लहान मुलांमधला Pneumonia आताच ओळखा.

Disclaimer:या ब्लॉगमध्ये दिलेली माहिती केवळ सामान्य आरोग्यजागरूकता वाढवण्यासाठी आहे. येथे उल्लेख केलेली माहिती कोणत्याही प्रकारची वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचार म्हणून घेतली जाऊ नये. तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास कृपया तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. ब्लॉगमधील माहिती शास्त्रीय अभ्यास, तज्ज्ञांचे मत आणि उपलब्ध स्रोतांवर आधारित असून कालांतराने बदलू शकते. या लेखातील माहिती वापरण्याची जबाबदारी पूर्णतः वाचकाची राहील

Leave a Comment