Heart Attack होण्याच्या आधी डाव्या हाताला का दुखायला सुरुवात होते?

Heart Attack Symptoms:-

तुम्ही टीव्ही मध्ये किंवा आपल्या खऱ्या आयुष्यात पाहिल असेल की जेव्हा कधी एखाद्या व्यक्तीला छातीत दुखायला लागत थोडक्यात Heart Attack येत असताना तो किंवा ती व्यक्ती छातीला हात लावते सोबतच त्या व्यक्तीच्या डाव्या हाताला जडपणा येतो.सोबतच डावा हात दुखायला लागतो.हे असच होत नसते आपलं शरीर आपल्याला संकेत देत असत की आपल्या शरीरात मोठ काही तरी होणार आहे.तरी तज्ञ सांगतात की आपण ह्या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

left arm pain in heart attack

Heart Attack
Image representing a heart inside of a male human body.

जेव्हा हृदयाच्या स्नायूंना कोरोनरी आरट्री मxध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही,
तेव्हा हृदय वेदनांचे संकेत पाठवते. हृदय आणि डाव्या हातातील नसा एकाच मार्गाने मेंदूकडे जात असतात. यामुळे मेंदू वेदनांच्या मूळ स्रोताचा माग काढू लागतो आणि डाव्या हातातून येणारी वेदना समजतो. याला रेफरल पेन म्हणतात.

हृदय आणि डाव्या हातातील नसा प्रामुख्याने T1 ते T4 नावाच्या पाठीच्या नसांनी जोडल्या जातात. जेव्हा हृदयाला ऑक्सिजनची कमतरता असते, तेव्हा वेदनांचे संकेत या नसांमधून संपूर्ण डाव्या बाजूला, विशेषतः खांदा, हात आणि जबड्यात प्रसारित केले जातात.

हृदय शरीराच्या डाव्या बाजूला थोडेसे झुकलेले असते, त्यामुळे हृदयाच्या स्नायूंना अडथळा किंवा ऑक्सिजनची कमतरता त्या बाजूला जास्त जाणवते. जर डाव्या अँटेरियर डिसेंडिंग (LAD) धमन्यांमध्ये अडथळा आला तर वेदना थेट डाव्या बाजूला जाणवते. डॉक्टर त्यांना विंडो-मेकर धमन्या देखील म्हणतात, कारण पूर्ण अडथळा घातक ठरू शकतो.

दावा हात दुखायला लागला म्हणजे ते Heart Attack च असेल अस नाही पण ते दुखणं काही मिनिटांपेक्षा जास्त वेळ टिकून राहत असेल सोबत छातीत जडपणा, श्वास घ्यायला त्रास होत असेल,अंगाला घाम येत असेल तर लवकरात लवकर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेच असत.

Disclaimer:- ह्या लेखामध्ये दिली गेलेली माहिती शैक्षणिक उद्देशाने सांगितली गेलेली आहे.तरीही कोणताही व्यायाम किंवा उपचार करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Side effects of drinking tea : चहा हृदयाच्या ठोक्यांना करू शकतो कमी.

Health Tips In Winter: ह्या 5 गोष्टी करा,ज्या तुम्हाला हिवाळ्यात आजारापासून दूर ठेवतील.

Male Breast Cancer: पुरुषांमध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरच प्रमाण का वाढतंय?

https://maharashtratimes.com/lifestyle-news/health-news/stanford-gastroenterologist-doctor-saurabh-sethi-reveals-3-powerful-anti-cancer-foods-to-add-to-your-daily-diet/articleshow/125289869.cms

Leave a Comment