winter
How to stay fit in winter:
मित्रांनो थंडी आता सुरू झालेली आहे आणि आपल्याला माहितीच आहे थंडी जशी थंड हवा घेऊन येते त्याच सोबत अनेक आजारांना सुद्धा थंडी मध्ये निमंत्रण दिलं जात. त्यात हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी होते ज्यामुळे सर्दी, खोकला, ताप, फ्लू ह्या सारखे आजार आपल्याला होऊ शकतात.ज्याने आपलं शरीर कमकुवत होत.

ह्या सगळ्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर आचार्य बालकृष्ण ह्यांनी काही घरगुती उपाय सांगितले आहेत जे तुम्ही फॉलो केले तर नक्कीच तुम्हाला ह्या हिवाळ्यामध्ये आजारांपासून दूर राहता येईल.
१) सकाळी लवकर उठून व्यायाम करावा:
हिवाळ्यामध्ये तुमचं शरीर गरम ठेवण्यासाठी आचार्य बालकृष्ण ह्यांनी प्रत्येकाला किमान सूर्यनमस्कार योगा सारखा हलका व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे. जेणे करून आपलं शरीर उबदार राहील.
२)लवकर झोपा आणि लवकर उठा:
हिवाळ्यामध्ये जर आजार टाळायचे असतील तर आपण रात्री लवकर झोपल पाहिजे आणि सकाळी लवकर उठलेल असल पाहिजे.जास्त झोप काढल्यामुळे आपलं शरीर सुस्त होऊन जात.
३) हिवाळ्यात उपाशी राहू नका:
आचार्य बालकृष्ण सांगतात की हिवाळ्यामध्ये आपली पचनशक्ती मंदावलेली असते.त्यामुळे वेळेवर जेवण केलं पाहिजे जेणेकरून अशक्तपणा किंवा इतर आजार आपल्याला होऊ नये.
४) रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपू नका:
आचार्य बालकृष्ण ह्यांनी सांगितल्या प्रमाणे रात्री जेवण केल्यानंतर लगेच झोपू नये त्याऐवजी थोडा चालण्याचा व्यायाम करावा ज्यामुळे खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते आणि शरीर हलकं राहते.
५) हिवाळ्यात अंघोळ करणं गरजेचं:
काही लोकांना हिवाळ्यामध्ये अंघोळ न करण्याची सवय असते पण ह्यामुळे त्वचेचे आजार होणे,अंगाला खाज सुटणे असे प्रकार होऊ शकतात.त्यामुळे हिवाळ्यामध्ये सुद्धा दिवसातून एकदा अंघोळ नक्की करावी.
Disclaimer:- ह्या लेखामध्ये दिली गेलेली माहिती शैक्षणिक उद्देशाने सांगितली गेलेली आहे.तरीही कोणताही व्यायाम किंवा उपचार करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
Side effects of drinking tea : चहा हृदयाच्या ठोक्यांना करू शकतो कमी.
Heart Attack होण्याच्या आधी डाव्या हाताला का दुखायला सुरुवात होते?