आजच्या जमान्यात Running हा सगळ्यात सोप्पा आणि सगळ्यात इफेक्टिव्ह असा व्यायाम प्रकार आहे.पण हा जरी सोप्पा स्वस्त आणि भारी व्यायाम प्रकार वाटत असला तरी हा करताना सुद्धा काळजी मात्र घेतली गेली पाहिजे. त्याआधी तुम्हाला रनिंग करण्याचे फायदे काय काय येत ते सांगतो आणि रनिंग करताना काय काळजी घेतली पाहिजे ते सुद्धा बघू.

- Running exercise benefits in marathi:- धावण्याचे फायदे
१) हृदयासाठी रनिंग म्हणजे सोने पे सुहागा : नियमित रनिंग केल्यामुळे आपला रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि अर्थातच त्यामुळे हृदय मजबुत बनते.
२) वजन मापातच राहणार: रनिंग केल्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त कॅलरीज जळतात त्यामुळे ऑटोमॅटिक आपलं वजन कंट्रोलमध्ये राहत.
३) डोक्याचा ताण कमी होतो: धावण्याचा व्यायाम आपण जेव्हा सुरू करतो तेव्हा आपल्या शरीरात हॅपी हार्मोन्स रिलीज होतात, त्यामुळे आपल्या शरीरातला म्हणजेच डोक्याचा ताण तणाव कमी होतो.
४) शरीरातील हाडे मजबुत होतात: धावल्याने रक्तप्रवाह सुधारतो, त्यामुळे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D हाडांपर्यंत नीट पोहोचतात. रनिंगमुळे वजन कमी झाल्याने हाडांवरील अतिरिक्त ताण कमी होतो.
५) क्वालिटी झोप मिळणार म्हणजे मिळणार: रनिंग केल्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते.त्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
- Running करताना काय काळजी घ्यावी.
१) चांगले शुज घाला: रनिंग करताना आपल्या सांध्यावर अतिरिक्त भार पडतो. हा भार व्यवस्थित पडावा यासाठी चांगल्या कंपनीचे रनिंगचे शुज घेण अत्यंत गरजेचे आहे. शूज शरीरासाठी शॉक अब्सोरवरच काम करतात

२)योग्य डाएट घ्या : धावण्याचा व्यायाम केल्यामुळे शरीरातुन अतिरिक्त कॅलरीज बर्न होतात,त्या भरून काढण्यासाठी योग्य डायट करणे अत्यंत गरज आहे. रनिंग सोबतच रिकव्हरी सुद्धा तितकीच गरजेची आहे.

३)सुरुवातीलाच जास्त जोरात पळायच नाही: रनिंग सुरू केल्यावर लगेच जोरात पळण्याची काहीही गरज नाही, हळूहळू आणि सातत्याने रनिंग केल्यानंतर आपण आपला स्टॅमिना आणि ताकद वाढु शकतो.अचानक जास्त वेगाने पळल्याने आपल्याला गंभीर दुखापत होऊ शकते.

Disclaimer:- ह्या लेखामध्ये दिली गेलेली माहिती शैक्षणिक उद्देशाने सांगितली गेलेली आहे.तरीही कोणताही व्यायाम किंवा उपचार करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
Side effects of drinking tea : चहा हृदयाच्या ठोक्यांना करू शकतो कमी.
Heart Attack होण्याच्या आधी डाव्या हाताला का दुखायला सुरुवात होते?