Life Insurance घेताय मंग ह्या 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

Life insurance

Introduction

बरेच जण आजही ह्या धावपळीच्या जीवनात विम्या बाबतीत जास्त जागरूक नाहीयेत किंवा त्यांना त्याचं अजूनही महत्त्व माहित नाही. एखाद्या व्यक्तीने जर विमा घेतलेला असेल तर त्याच्या पाठीमागे त्यांच्या जवळच्या व्यक्तींची किंवा कुटुंबाची होणारी हेळसांड कमी होऊ शकते.पण कधी कधी लोकांकडून चुकीचा विमा घेतल्या गेल्यामुळे विमा असूनही त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागतो आणि पैसे वाया जातात ते वेगळेच

Life Insurance विमा घेताना ह्या 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

१)किती रुपयांचा विमा कव्हर असावा? (Best premium of life insurance.)

हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे कारण याच विम्याच्या रकमेमुळे आपल्या मागे आपल्या कुटुंबाच्या आर्थिक अडचणी दूर होणार आहे. त्यासाठी अर्थतज्ञ सांगतात की विमा हा नेहमी आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या दहा पट असावा म्हणजे जर तुम्ही महिन्याला एक लाख रुपये कमवत असाल तर तुमचा विमा हा जवळपास दीड कोटीचा तरी असावा.

२)कोणता प्लॅन घ्यावा? (Best plan for life insurance)

अर्थविषयक सल्लागार प्रियांक ठक्कर ह्यांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही तुमच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण देऊ इच्छित असाल, तर टर्म प्लॅन घेणं फारच चांगलं राहिल. त्याचा प्रीमियम फार कमी असतो, मात्र, कव्हरेज मोठा असतो.टर्म प्लॅनमध्ये कोणत्याही बचतीचं तत्त्व नसतं. टर्म प्लॅन एका निश्चित कालावधीसाठी असतो. त्यामुळे, कमी वयातच टर्म प्लॅन खरेदी केला पाहिजे.

३) विमा कंपनीचा claim settlement ratio नेहमी तपासा.(life insurance claim settlement)

विमा घेताना आपण कोणत्या कंपनीचा विमा घेत आहोत हे खुप गरजेचं आहे.ज्या कंपनीचा claim settlement ratio (CSR) चांगला आहे त्याच कंपनीचा विमा आपण घेतला पाहिजे कारण अशा कंपन्या ऐनवेळी आपल्या कस्टमरला नाहक त्रास देत नाही. त्यामुळे विमा कंपनीचा CSR नेहमी चेक करा. बऱ्याच कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षक स्कीम देत असतात परंतु त्या आकर्षक स्कीम बरोबरच त्यांचे नियम आणि अटी सुद्धा असतात त्या नेहमी आपण तपासूनच विमा घेतला पाहिजे.म्हणून, घाईघाईनं निवड करण्याऐवजी, प्रतिष्ठित आणि योग्य लौकिक असलेली कंपनी निवडणं कधीही चांगलं ठरू शकतं.

४) विमा घेताना सगळी हिस्ट्री आधीच सांगुन ठेवा. (life insurance rules)

बराच वेळा ग्राहक विमा घेत असताना काही गोष्टी लपून ठेवत असतात जेणेकरून विम्याचा प्रीमियम कमी यावा पण ह्या गोष्टींचा तोटा आपल्याला होऊ शकतो.विमा कंपन्या ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन ऐनवेळी विमा नाकारू शकतात.जर तुम्हाला काही आरोग्याच्या समस्या असतील तर त्या आधीच स्पष्टपणे सांगा, अन्यथा जेव्हा खरोखरच गरज असते, नेमकं तेव्हाच कंपनी तुमचा दावा नाकारू शकते.तुम्हाला जास्त माहिती नसेल तर आर्थिक सल्लागाराला ह्या बाबतीत विचार आणि माहिती घ्या.

Side effects of drinking tea : चहा हृदयाच्या ठोक्यांना करू शकतो कमी.

Heart Attack होण्याच्या आधी डाव्या हाताला का दुखायला सुरुवात होते?

Health Tips In Winter: ह्या 5 गोष्टी करा,ज्या तुम्हाला हिवाळ्यात आजारापासून दूर ठेवतील.

Leave a Comment