Introduction:

Breakfast Skip side effects:
आजच्या धावपळीच्या जगात सकाळचा नाश्ता (Breakfast) स्किप करणे अनेकांसाठी रोजची गोष्ट झाली आहे. कधी उशिरापर्यंत झोप, कधी ऑफिसची घाई, तर कधी घरकाम — अशा अनेक कारणांनी नाश्ता केला जात नाही. पण तज्ञांच्या मते नाश्ता स्किप करणे म्हणजे केवळ एक वेळेचे जेवण चुकवणे नाही, तर शरीराच्या नैसर्गिक कार्यप्रणालीला बिघडवण्यासारखे आहे.
चला तर मग जाणून घेऊया, रोज नाश्ता न केल्याने तुमच्या शरीराला कोणकोणते नुकसान होऊ शकते.
1. शरीर ‘न्यूट्रिशनल डेफिसिट’ मध्ये जातं:
नाश्ता स्किप केल्यावर शरीराला सकाळी आवश्यक पोषक तत्त्वे मिळत नाहीत. त्यामुळे दुपारी जास्त भूक लागते आणि आपण नकळत मोठ्या प्रमाणात किंवा उच्च कॅलरीचं अन्न खाऊन टाकतो.यामुळे वजन वाढायला सुरुवात होते आणि पोटाभोवती चरबी जमा व्हायला लागते.

2. घ्रेलिन (भूक वाढवणारे हार्मोन) सक्रिय होते
नाश्ता टाळल्यानंतर भूक वाढवणारे हार्मोन ‘घ्रेलिन’ जास्त प्रमाणात तयार होते. त्यामुळे सतत काहीतरी गोड किंवा तळलेलं खाण्याची इच्छा वाढते.अनियमित खाणे सुरू होते,शरीराची इंसुलिन सेन्सिटिव्हिटी कमी होते परिणामी रक्तातील साखर असंतुलित होते आणि वजन वाढतं.
3. हृदयावर ताण वाढतो
काही संशोधनात असे दिसले आहे की, नाश्ता दररोज टाळणाऱ्या लोकांमध्ये LDL (वाईट कोलेस्ट्रॉल) जास्त प्रमाणात आढळते.हे कोलेस्ट्रॉल हृदयरोग, ब्लॉकेज आणि हार्ट अटॅकचे प्रमुख कारण आहे.सकाळी नाश्ता न मिळाल्याने शरीर ‘मेटाबॉलिक स्ट्रेस’ मध्ये जातं, ज्याचा दीर्घकालीन परिणाम हृदयावर होतो.

4. मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका
नाश्ता स्किप करण्याची सवय हळूहळू पुढील समस्या निर्माण करू शकते जस की पोटाची चरबी वाढणे,उच्च रक्तदाब,वाढलेली रक्तातील साखर,खराब कोलेस्ट्रॉल.या सर्व लक्षणांना मिळून मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतात, जे पुढे जाऊन टाइप-2 डायबेटीसचा धोका वाढवते.

5. ऊर्जा कमी, चिडचिड आणि थकवा
शरीराला सकाळी ऊर्जा न मिळाल्यास:लवकर थकवा जाणवतो,चिडचिड वाढते,कामात लक्ष लागत नाही,मेंदूची कार्यक्षमता कमी होते,अस्थिर ब्लड शुगरमुळे मानसिक तणाव वाढण्याची शक्यता असते.
मग ह्यावर काय उपाय करावे?
- सकाळी हलकं पण पौष्टिक नाश्ता नक्की घ्या
- 10–15 मिनिटं तरी नाश्त्यासाठी काढा
- ओट्स, पोहे, उपमा, अंडी, फळे, ड्रायफ्रूट्स, दही – अशा पर्यायांचा समावेश करा

नाश्ता स्किप करणे ही छोटी गोष्ट वाटली तरी तिचे परिणाम शरीरावर खोलवर होतात. वजन वाढणं, शुगर, हृदयरोग, चिडचिड, थकवा — या सर्व समस्या केवळ दररोजच्या एका चुकीच्या सवयीमुळे उद्भवू शकतात.म्हणून, रोज नाश्ता करा आणि दिवसाची सुरुवात ऊर्जा व उत्साहाने करा.
https://www.americanpharmaremedies.com/archives/10184
Side effects of drinking tea : चहा हृदयाच्या ठोक्यांना करू शकतो कमी.
Knee health tips: पायऱ्या चढताना गुडघ्यांमधून आवाज का येतो? तज्ज्ञ सांगतात खरी कारणे