Dharmendra Death: कोणत्या आजारांशी झुंज देत होते बॉलीवूडचे ‘ही-मॅन’? जाणून घ्या किती धोकादायक होती त्यांची अवस्था

बॉलीवूडचे ज्येष्ठ आणि सर्वांचे लाडके अभिनेता Dharmendra यांनी आज अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांना श्वास घेण्यात अडचण जाणवल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 89 वर्षांचे धर्मेंद्र गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर्सच्या कडक देखरेखीत होते.

Dharmendra
Dharmendra.

Dharmendra नेमक्या कोणत्या आजाराने त्रस्त होते?

मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र सुरुवातीला फक्त साध्या आरोग्य तपासणीसाठी गेले होते. मात्र, चाचण्यांनंतर डॉक्टरांनी त्यांना काही दिवसांसाठी निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय घेतला.रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास त्रास (Breathing Difficulty) जाणवत होता. त्यामुळे त्यांना ICU मध्ये ठेवून मॉनिटरिंग करण्यात येत होते.

डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल सांगितले होते की:

हार्ट रेट सुमारे 70,ब्लड प्रेशर 140/80,युरिन आउटपुट सामान्य,कोणतीही तातडीची गंभीर समस्या नाही.काळजी म्हणून काही दिवस त्यांना ICU मध्ये ठेवण्यात आले होते. मध्ये एकदा त्यांच्या निधनाची अफवा पसरली होती, पण ती त्यांच्या मुलीने खोडून काढली होती.

श्वास घेण्यात येणारी अडचण किती गंभीर होती?

वयाच्या 89व्या वर्षी फुफ्फुसे आणि हृदयाची कार्यक्षमता नैसर्गिकपणे कमी होत जाते. त्यामुळे कमी मेहनतीतही धाप लागणे, थकवा येणे यासारख्या समस्या दिसू शकतात. धर्मेंद्र यांच्या बाबतीत ही समस्या वारंवार दिसू लागली होती.

यामागील कारणे अशी असू शकतात:

  • फुफ्फुसांचा कार्यक्षमतेत घट
  • शरीरात पाणी साचणे
  • सौम्य फुफ्फुस संक्रमण
  • हृदयाचे अनियमित ठोके
  • ऑक्सिजनची कमी पातळी.

सामान्य वयस्क व्यक्तीमध्ये थोडा श्वास लागणे गंभीर नसते. पण धर्मेंद्र यांच्या वयात ही समस्या पुन्हा पुन्हा होत होती, हेच चिंताजनक ठरत होते.

Wikipedia.

https://en.wikipedia.org/wiki/Dharmendra

धर्मेंद्र यांची अलीकडची सर्जरी

यंदाच्या एप्रिल महिन्यात त्यांची मोतिबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया झाली होती. वय असूनही त्यांनी जलद रिकव्हरी केली आणि कामातही सक्रिय राहण्याचा प्रयत्न केला.

कोणत्या चित्रपटांमध्ये दिसणार होते धर्मेंद्र?

धर्मेंद्र नुकतेच ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ (2024) या चित्रपटात दिसले. शाहिद कपूर आणि कृति सेनन या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते.याशिवाय ते श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘इक्कीस’ या आगामी चित्रपटातही झळकणार होते.

Dharmendra यांचे निधन ही संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीसाठी मोठी हानी आहे. दीर्घकाळ श्वास घेण्यात येणाऱ्या अडचणींमुळे त्यांची प्रकृती कमजोर होत गेली आणि शेवटी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अभिनयाची छाप लाखो चाहत्यांच्या मनात कायमस्वरूपी जिवंत राहणार आहे.

Heart Attack होण्याच्या आधी डाव्या हाताला का दुखायला सुरुवात होते?

Leave a Comment