Intro:
Egg yolk benefits

अंडं आणि विशेषतः अंड्यातील पिवळं बलक याबद्दल अनेक गैरसमज आजही प्रचलित आहेत. अनेकांना वाटतं की पिवळं बलक म्हणजे कोलेस्ट्रॉल आणि कोलेस्ट्रॉल म्हणजे आजार. पण आधुनिक संशोधनानुसार ही भीती कालबाह्य ठरते. योग्य आहार आणि जीवनशैलीसोबत अंडं हे शरीरासाठी एक संपूर्ण व पौष्टिक सुपरफूड आहे.
कोलेस्ट्रॉल – खरोखरच शत्रू आहे का?
कोलेस्ट्रॉल हे शरीरात होणाऱ्या अनेक महत्वाच्या प्रक्रियांसाठी उपयुक्त घटक आहे.
हॉर्मोन्सची निर्मिती
व्हिटॅमिन D ची तयारी
पेशींच्या आवरणांची संरचना.
आपल्या शरीरातील ७०-८०% कोलेस्ट्रॉल लिव्हर स्वतः तयार करतो. त्यामुळे अंड्यातील कोलेस्ट्रॉलचा शरीरातील फॅट किंवा कोलेस्ट्रॉल वाढण्याशी संबंध फारसा राहात नाही.याचा अर्थ ‘अंडं खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतो’ हा समज चुकीचा आहे.

खरी समस्या – इंफ्लेमेशन आणि इन्सुलिन रेसिस्टन्स
हृदयरोगासाठी एकमेव दोषी कोलेस्ट्रॉल नसून क्रॉनिक इंफ्लेमेशन, वाढलेलं इन्सुलिन, आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हे महत्वाचे कारण आहेत.
ज्या लोकांच्या आहारात—जास्त कार्बोहायड्रेट्स,सतत वापरले जाणारे सीड ऑइल्स,साखर आणि रिफाइंड फूड
निष्क्रिय जीवनशैली आढळते, त्यांच्यात इंफ्लेमेशन जास्त दिसते. या अवस्थेमध्ये कोलेस्ट्रॉलचे पार्टिकल्स ऑक्सिडाइज होऊन हृदयरोगाचा धोका वाढू शकतो म्हणजेच समस्या अंड्याची नसून चुकीच्या आहारपद्धतीची आहे.
अंड्याचे पोषणमूल्य – निसर्गाची उत्तम भेट
अंडं म्हणजे एक संपूर्ण, संतुलित आणि नैसर्गिक पोषक घटकांनी भरलेला पदार्थ.
फक्त ‘एग व्हाईट’ खाण्यापेक्षा संपूर्ण अंडं खाणं अधिक फायदेशीर.
अंड्यात असणारी प्रमुख पोषक तत्त्वे :
उच्च दर्जाचे प्रोटीन,कोलीन (पिवळं बलक) – मेंदू, लिव्हर व नर्व्हस सिस्टिमसाठी अत्यंत महत्त्वाचे
ल्युटेन आणि झीएक्सॅन्थिन – डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त,ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स,फॅट-सोल्युबल व्हिटॅमिन्स – A, D, E, K
ही सर्व तत्त्वे एकत्रितपणे—
इंफ्लेमेशन कमी करण्यास
ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास
हृदय आणि मेटाबॉलिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत करतात.
अंड्याबाबत वैज्ञानिक काय सांगतात?
- अनेक मोठ्या अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की—
- दररोज २ अंडी खाल्ल्याने LDL वाढत नाही
- “स्मॉल डेन्स LDL” कमी होतो (जो धोकादायक प्रकार आहे)
- “लार्ज बॉयंट LDL” वाढतो (जो सुरक्षित प्रकार आहे)
- HDL म्हणजेच “गुड कोलेस्ट्रॉल” सुधारतो
- ट्रायग्लिसराइड्सही कमी होतात
हे बदल हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात.
फॅटची भीती नाही—संतुलित दृष्टिकोन आवश्यक
फंक्शनल मेडिसिन सदैव ‘रूट-कॉज’वर भर देते.
अंडं टाळल्याने शरीरातील आवश्यक पोषक तत्त्वांचं मोठं नुकसान होऊ शकतं.
भारतीय आहारात अंडं हे—सहज उपलब्ध,परवडणारे,प्रोटीन समृद्ध,शून्य साखर असलेले अशा उत्कृष्ट अन्नांपैकी एक आहे.
खास करून खालील परिस्थितीत अंडे उपयुक्त :
- लठ्ठपणा
- प्रीडायबिटीज
- डायबिटीज
- PCOS
- फॅटी लिव्हर
या अवस्थांमध्ये अंडं कार्बोहायड्रेट कमी ठेवून ब्लड शुगर नियंत्रणात मदत करतं.
कोणी सावध राहावे?
ज्या व्यक्तींना अंड्याची अॅलर्जी आहे, त्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने अंड्याचे प्रमाण ठरवावे.
बाकी बहुतांश लोकांसाठी अंडं पूर्णपणे सुरक्षित आणि आरोग्यदायी आहे.
निष्कर्ष
अंड्याला दोष देण्यापेक्षा आपल्या दैनंदिन आहारातील—
सीड ऑइल्स,
रिफाइंड साखर,
जास्त धान्ये,
आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ यांकडे लक्ष देणे अधिक आवश्यक आहे.
योग्य जीवनशैलीसोबत रोजच्या ताटात दोन अंडी—
हे आज लक्झरी नसून मेटाबॉलिक हेल्थसाठी सर्वात सोपं, प्रभावी आणि पोषणमय पाऊल आहे.
अंड्यात जीव नसतो, त्यामुळे त्याबद्दल भीती किंवा मिथक निर्माण करण्याचंही कारण नाही.
संपूर्ण अंडं खा, संतुलित जेवण करा आणि शरीराला आवश्यक पोषण द्या.
https://www.healthline.com/nutrition/proven-health-benefits-of-eggs
Side effects of drinking tea : चहा हृदयाच्या ठोक्यांना करू शकतो कमी.
Ginger Tea: आल्याचा चहा खरंच वजन कमी करतो का? नवीन रिसर्च काय सांगते ते जाणून घ्या
Disclaimer:
या ब्लॉगमध्ये दिलेली माहिती केवळ सामान्य आरोग्यजागरूकता वाढवण्यासाठी आहे. येथे उल्लेख केलेली माहिती कोणत्याही प्रकारची वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचार म्हणून घेतली जाऊ नये. तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास कृपया तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. ब्लॉगमधील माहिती शास्त्रीय अभ्यास, तज्ज्ञांचे मत आणि उपलब्ध स्रोतांवर आधारित असून कालांतराने बदलू शकते. या लेखातील माहिती वापरण्याची जबाबदारी पूर्णतः वाचकाची राहील.