Introduction:
sleep
मित्रांनो तज्ञ डॉक्टर सांगतात की तुम्ही जेव्हा झोपायला जाता त्याच्या कमीत कमी दोन ते तीन तास आधी काहीही खाऊ किंवा पिऊ नये. ही गोष्ट फॉलो केली तर रात्रीच्या झोपेत व्येतेय येत नाही. पण आपण ह्या उलट करतो जेवण झाले की लगेच झोपायला जातो हे चुकीच आहे.
ह्या गोष्टी झोपायच्या आधी खाऊ किंवा पिऊ नये.
१) जेवणानंतर गोड पदार्थ खाऊ नये:
आपल्याला सांगितलं जातं की जेवल्यानंतर तोंड गोड करावं म्हणजे एखादा गोड पदार्ध खायला दिला जातो पण हे पूर्णपणे चुकीच आहे.लोक आईस्क्रीम किंवा चॉकलेट खातात पण ह्यामुळे तुम्हाला सकाळी उठताना सुस्तपणा वाटू शकतो त्यामुळे ह्या गोष्टी टाळाव्यात.

२) जेवणानंतर चहा,कॉफी पिऊ नये:
संध्याकाळच्या वेळी आपल्याला चहा किंवा कॉफी तुम्हाला आरामदायी वाटू शकते, परंतु कॅफिन तुमचे मन शांत होण्यापासून रोखते. ते मेंदूला सक्रिय ठेवते आणि झोपायला त्रास देते.
३) तळलेले पदार्थ टाळावे:
रात्री झोपायच्या पूर्वी आपल्याला चमचमीत खाण्याची सवय असते परंतु ह्याच पदार्थांमुळे आपल्या शरीरातील चरबीचे प्रमाण वाढू शकते. शिवाय पोटात जडपणा गॅस ऍसिडिटी यासारखे समस्या वाढू शकतात त्यामुळे हे पदार्थ टाळावे.

४)झोपायच्या आधी जास्त पाणी पिऊ नये:
दिवसा पाणी पिणे ही खुप चांगली सवय आहे पण झोपायच्या आधी जास्त पाणी कधीच पिऊ नये नाहीतर रात्रीच्या वेळी वारंवार बाथरूमला जाण्यामुळे आपल्या झोपेत व्यत्यय येऊ शकतो आणि ऍसिडिटी सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
५) अल्कोहोल घेऊ नये:
तसं पाहायला गेलं तर दारू ही आपल्या शरीरासाठी वाईट असते.पण काहीना ती घेतल्याशिवाय झोप येत नाही. अल्कोहोल शरीराला डिहायड्रेट करते आणि रात्रभर वारंवार बाथरूममध्ये जावे लागते. यामुळे झोपेत व्यत्यय येऊ शकतो आणि सकाळी तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो.

Disclaimer:- ह्या लेखामध्ये दिली गेलेली माहिती शैक्षणिक उद्देशाने सांगितली गेलेली आहे.तरीही कोणताही व्यायाम किंवा उपचार करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
https://www.sleepfoundation.org/nutrition/food-and-drink-promote-good-nights-sleep
sherlyn chopra breast surgery: ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकल्याने काय होऊ शकत?
Male Breast Cancer: पुरुषांमध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरच प्रमाण का वाढतंय?