Ginger Tea: आल्याचा चहा खरंच वजन कमी करतो का? नवीन रिसर्च काय सांगते ते जाणून घ्या

Ginger Tea Benefits in Marathi.

Introdcution:

भारतात आल्याचा चहा म्हणजे रोजच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. सकाळचा आळस असो किंवा थकवा दूर करायचा असो—आल्याचा चहा आपल्यापैकी बहुतेकांना आवडतोच. स्वाद वाढवण्याबरोबरच आलं आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते.पण एक प्रश्न अनेकांच्या मनात असतो

“आल्याचा चहा खरोखरच वजन कमी करण्यास मदत करतो का?”

याच विषयावर अलीकडेच एक नवीन रिसर्च समोर आला आहे. पाहूया या दाव्याबाबत विज्ञान काय सांगते.

Ginger Tea
gettyimage

नवीन रिसर्च काय सांगतो?

नेशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिन मध्ये प्रकाशित झालेल्या एका रिव्ह्यू आणि मेटा-ऍनालिसिस मध्ये असे आढळले की, आल्याचे सेवन वजनावर सकारात्मक परिणाम करू शकते.या विश्लेषणात 14 वेगवेगळ्या स्टडीज आणि एकूण 473 लोकांचा समावेश होता.

या रिसर्चनुसार आल्याचे नियमित सेवन केल्यास—

  • बॉडी वेटमध्ये हलका पण सकारात्मक घट
  • वेेस्ट-टू-हिप रेशियोमध्ये सुधारणा
  • फास्टिंग ग्लूकोजमध्ये कमी
  • इन्सुलिन रेजिस्टन्समध्ये घट
  • गुड कोलेस्ट्रॉल (HDL) वाढण्यास मदत

असे फायदे दिसून आले.

तथापि, या अभ्यासात असेही नमूद केले आहे की आल्याचा BMI, इन्सुलिन पातळी, ट्रायग्लिसराइड्स, टोटल कोलेस्ट्रॉल आणि LDL वर फारसा प्रभाव आढळला नाही.म्हणजेच, परिणाम फार मोठे नसले तरी आलं वजनाशी संबंधित काही पैलूंवर पॉझिटिव्ह प्रभाव टाकते.

वजन कमी करण्यात आलं किती प्रभावी आहे?

या रिव्ह्यूमध्ये वजनातील बदल सिग्निफिकंट म्हणजेच उल्लेखनीय असल्याचे म्हटले आहे.पण अद्यापही यासंदर्भातील संशोधन मर्यादित आहे.म्हणून आल्यामुळे मोठ्या प्रमाणात वजन कमी होते असे ठामपणे सांगता येत नाही.तरीही

gettyimage

तुम्ही रोज बनवायच्या चहात थोडे आलं घातले तर—

  • स्वाद वाढतो
  • मेटाबॉलिझमला हलका बूस्ट मिळतो
  • शरीराला काही प्रमाणात फायदेशीर परिणाम मिळतात हे नक्की.

आल्याचे इतर आरोग्यदायी फायदे:

वजन कमी करण्याचा दावा पूर्णपणे सिद्ध नसला तरी आल्याचे अनेक वैज्ञानिकदृष्ट्या मान्य फायदे आहेत:

  • पचन सुधारते

आलं पोटातील गॅस, अपचन आणि पोटफुगी कमी करण्यास मदत करते.

  • उलटीवर आराम देते.

ट्रॅव्हल सिकनेस किंवा प्रेग्नंसीमधील मतली कमी करण्यास उपयुक्त.

  • सूज आणि वेदना कमी करते

त्यातील अँटिऑक्सिडंट व अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म सूज आणि वेदना कमी करतात.

  • सर्दी-खोकल्यात मदत

आलं रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि इन्फेक्शनपासून थोडासा बचाव मिळतो.

  • मधुमेह व कर्करोगाचा धोका कमी करण्यात सहाय्य

काही स्टडीजमध्ये सूक्ष्म पण सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

  • पोषक तत्त्वांचा स्रोत

आल्यामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात,ते शरीरासाठी पूरक ठरू शकतात.

gettyimage

तथापि, पूर्ण पोषणासाठी फक्त आल्यावर अवलंबून राहू नये; ते एक सप्लिमेंटरी हेल्थ ऑप्शन आहे.आल्याचा चहा वजन झपाट्याने कमी करते असा दावा पूर्णपणे सिद्ध नाही.पण वैज्ञानिकदृष्ट्या हे स्पष्ट आहे की—

  • आलं शरीरावर सौम्य, सकारात्मक आणि आरोग्यदायी परिणाम करते.
  • म्हणूनच रोजच्या चहात थोड आलं घालणे.
  • चविष्टही आहे
  • आरोग्यदायीही आहे
  • आणि वजन व्यवस्थापनात थोडीफार मदतही करू शकते

Disclaimer:

या ब्लॉगमध्ये दिलेली माहिती केवळ सामान्य आरोग्यजागरूकता वाढवण्यासाठी आहे. येथे उल्लेख केलेली माहिती कोणत्याही प्रकारची वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचार म्हणून घेतली जाऊ नये. तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास कृपया तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. ब्लॉगमधील माहिती शास्त्रीय अभ्यास, तज्ज्ञांचे मत आणि उपलब्ध स्रोतांवर आधारित असून कालांतराने बदलू शकते. या लेखातील माहिती वापरण्याची जबाबदारी पूर्णतः वाचकाची राहील.

Side effects of drinking tea : चहा हृदयाच्या ठोक्यांना करू शकतो कमी.

पुरुषांनी लघवी बसून करावी की उभं राहून? आरोग्य आणि स्वच्छतेसाठी काय योग्य? महत्त्वाची माहिती.

https://www.healthline.com/nutrition/benefits-ginger-tea

Leave a Comment