How to increase focus and concentration: या 5 सवयींनी बनवा मेंदू अधिक तीक्ष्ण आणि स्मरणशक्ती मजबूत!

INTRODCUTION:-

How to increase focus and concentration: आजकाल “अरे… नाव काय होतं त्याचं?” किंवा “इथे का आलो होतो मी?” अशा प्रसंगांमध्ये आपण अडकतोच. मोबाईल कुठे ठेवला, शब्द जिभेच्या टोकावर पण आठवत नाही, लक्ष पटकन विचलित होते… ही समस्या आता सर्वसामान्य झाली आहे.

ताण, बदललेला जीवनक्रम आणि सतत स्क्रीनसमोरचा वेळ यामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होऊ शकते. पण चांगली गोष्ट काय माहितेय? मेंदू हा स्नायूसारखाच आहे — जितका वापराल तितका मजबूत होईल.

समस्या विसरण्याची असो किंवा स्मरणशक्ती वाढवायची असेल, काही साध्या सवयी मेंदूला ताजेतवाने आणि सक्रिय ठेवतात. चला तर मग जाणून घेऊया अशा 5 उत्तम सवयी ज्या तुमच मन अधिक तीक्ष्ण करतील.

1) रोज काहीतरी नवीन शिका:

नवीन भाषा, वाद्य, नृत्य किंवा कोडिंग… जे आवडेल ते शिका.नवे कौशल्य शिकताना मेंदूत नवीन न्यूरल कनेक्शन तयार होतात आणि स्मरणशक्ती दीर्घकाळ टिकते. मेंदूला नवीन काम दिलं की तो दहापट उत्साहीपणे काम करतो.

How to increase focus and concentration

2) मेंदूसाठी रोजचे छोटे ब्रेन-वर्कआउट:

सुडोकू, शब्दकोडे, पझल्स, शब्दखेळ – दररोज फक्त १०-१५ मिनिटे.ही छोटी खेळी स्मरणक्षमता वाढवते, तर्कशक्ती सुधारते आणि मन अधिक सतर्क ठेवते.

3) यादी लक्षात ठेवण्याचा सराव करा:

शॉपिंग लिस्ट किंवा टु-डू लिस्ट आधी लक्षात ठेवा, नंतर लिहिलेली यादी बाजूला ठेवून आठवण्याचा प्रयत्न करा.
हा छोटा खेळ वर्किंग मेमरी आणि फोकस दोन्ही वाढवतो.

4) नावे आणि चेहरे लक्षात ठेवण्याची ट्रिक:

एखाद्याला भेटलात की त्याचे नाव २-३ वेळा उच्चारा.त्याच्या चेहरेातील खास वैशिष्ट्याशी नाव जोडा – उदा. चष्मा असलेला अमेय, कुरळे केस असलेली पूजा इ.हे तंत्र आश्चर्यकारकरीत्या काम करते.

5) एखाद्याला शिकवा – माहिती दुप्पट पक्की:

तुम्ही जे शिकला ते मित्राला सांगा, चर्चा करा किंवा छोटं नोट बनवा.इतरांना समजावताना माहिती व्यवस्थित रचली जाते व दीर्घकाळ मेंदूत साठते.

दिवसातून थोडा वेळ स्क्रीनपासून दूर राहा.१०-१५ मिनिटे शांत बसून श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करा.मनातील गोंधळ कमी होतो आणि लक्ष-एकाग्रता दुपटीने सुधारते.विसरण्याची समस्या ही आजच्याच काळाची देणगी आहे, पण तिच्यावर उपायही सोपे आहेत.मेंदू रोज थोडा ताणायला हवा – शिकणं, खेळ, व्यायाम आणि विश्रांती यांचा समतोल ठेवलात की स्मरणशक्ती अगदी चकाकेल.

आजपासून या सवयींपैकी किमान एक तरी सुरू करा.थोड्याच दिवसांत तुम्हाला स्वतःतला बदल स्पष्ट जाणवेल.

https://www.health.harvard.edu/mind-and-mood/tips-to-improve-concentration

Lack of sleep:6 तासांपेक्षा कमी झोप, हे होतील शरीराचे हाल.

Hot or cold water in winter:थंडीत अंघोळ गरम पाण्याने करावी की थंड पाण्याने?

Disclaimer:या ब्लॉगमध्ये दिलेली माहिती केवळ सामान्य आरोग्यजागरूकता वाढवण्यासाठी आहे. येथे उल्लेख केलेली माहिती कोणत्याही प्रकारची वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचार म्हणून घेतली जाऊ नये. तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास कृपया तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. ब्लॉगमधील माहिती शास्त्रीय अभ्यास, तज्ज्ञांचे मत आणि उपलब्ध स्रोतांवर आधारित असून कालांतराने बदलू शकते. या लेखातील माहिती वापरण्याची जबाबदारी पूर्णतः वाचकाची राहील

Leave a Comment