Male Breast Cancer: पुरुषांमध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरच प्रमाण का वाढतंय?

पुरुषांनाही Breast cancer होऊ शकतो. जाणून घ्या त्याची कारणं, लक्षणं आणि उपचार

Male breast cancer symptoms :सध्या पुरुषांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चाललेलं दिसून आलेलं आहे.साधारणतः 60 ते 70 वयोगटातल्या पुरुषांमध्ये हे प्रमाण दिसते. अर्थात तो आधीही उद्भवू शकतो.
पुरुषांना स्तनाचा कर्करोग होऊ शकतो हेच माहिती नसतं. त्यामुळे माहितीच्या अभावापायी पुरुष स्तनामधील बदलांकडे दुर्लक्ष करतात.

  • Male Breast Cancer ची लक्षणे कोणती?


तज्ज्ञांच्या मते पुरुषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे कमी प्रमाणात असतात ज्याच्यामुळे पुरुष त्यांच्याकडे लक्ष सुद्धा देत नाही.
तरीही पुरुषांमध्ये छातीवर वेदनारहित गाठ किंवा सूज येणे, त्वचेचे डिंपल येणे, लालसरपणा किंवा रंग बदलणे, स्तनाग्राच्या आकारात किंवा आतल्या बाजूस वळणे, स्तनाग्रातून द्रव किंवा रक्त गळणे आणि काखेत किंवा कॉलरबोनभोवती सूज येणे यांचा समावेश आहे. जर यापैकी कोणतीही लक्षणे दीर्घकाळ टिकून राहिली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.

  • Male Breast Cancer Treatment आणि निदान कसं होत?

यामध्ये तर सगळ्यात आधी डॉक्टर मेमोग्राफी,अल्ट्रासाउंड आणि बायोप्सी करण्याचा सल्ला देतात. डॉक्टरांच्या मते पुरुषांच्या स्तनांच्या कर्करोगावर शस्त्रक्रीया, रेडिएशन थेरपी, किमोथेरपी, हार्मोन थेरपी असे महिलांच्या स्तनांच्या कर्करोगा प्रमाणेच Male breast cancer treatment मध्ये ट्रीटमेंट दिली जाते.

  • Male Breast Cancer मध्ये काय काळजी घ्यावी?


पुरुषांमध्ये जरी स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण कमी असलं तरीसुद्धा तो होऊ शकतो हे ही तितकच खरं आहे,अशावेळी पुरुषांना शारीरिक आणि वैद्यकीय मदती सोबतच मानसिक मजबुतीची आवश्यकता असते. अशावेळी कुटुंबाकडून आणि मित्रपरिवारा कडून मानसिक आधार मिळणं खूप गरजेचे असतं.

डॉक्टरांच्या मते पुरुषांमध्ये होणाऱ्या या स्तनांच्या कर्करोगावर उपचार शक्य आहेत. त्यासाठी पुरुषांनी आपल्या छातीच्या होणाऱ्या बदलांकडे गंभीरतेने पाहिलं पाहिजे आणि ह्यावर उपचारासाठी जे काही आहारात किंवा शारीरिक व्यायामात आवश्यक बदल आहेत ते डॉक्टरांच्या सल्ल्याने अवश्य करून घेतले पाहिजेत.

Disclaimer:- ह्या लेखामध्ये दिली गेलेली माहिती शैक्षणिक उद्देशाने सांगितली गेलेली आहे.तरीही कोणताही व्यायाम किंवा उपचार करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Side effects of drinking tea : चहा हृदयाच्या ठोक्यांना करू शकतो कमी.

Heart Attack होण्याच्या आधी डाव्या हाताला का दुखायला सुरुवात होते?

Leave a Comment