
Side effects of drinking tea :
आपल्या इथ सगळ्यात जास्त पिली जाणारी गोष्ट म्हणजे चहा.चहा हा बऱ्यापैकी लोकांच आवडत पेय आहे.
सकाळी उठल्यावर किंवा आळस घालवण्यासाठी नाहीतर मित्रांमध्ये गप्पा मारत असताना आपल्याला चहा हा लागतोच पण हाच चहा आपल्या हृदयाच्या ठोक्यांसाठी धोक्याचा ठरू शकतो अस दिसून आलेलं आहे.

सकाळी रिकाम्या पोटी गरम चहा घेतल्यामुळे पोटाच्या आतल्या भागाला त्रास होऊ शकतो. चहाच्या आम्लयुक्त स्वरूपामुळे ऍसिडिटी किंवा अल्सर सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

चहा मध्ये असलेल कॅफिन फक्त तुम्हाला अँक्टिव्ह ठेवत नाही तर तुमच्या हृदयाचे ठोके थोड्या वेळासाठी वाढवते.तुम्ही जर जास्त चहा पित असाल तर रात्रीच्या चहा पिण्याने तुमच्या स्लीप सायकल मध्ये बिघाड होऊ शकतो.ज्यामुळे निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
तर मंग चहा पिण्याची योग्य पद्धत काय आहे?
- सकाळी सकाळी रिकाम्या पोटी चहा घेण्या ऐवजी कोमट पाणी किंवा लिंबू पाणी पिऊन दिवसाची चांगली सुरुवात करावी.
- रात्री झोप मोड होऊ नये म्हणून संध्याकाळी 4 नंतर चहा घेऊ नये.
- चहा मध्ये साखरे ऐवजी नैसर्गिक गुळाचा वापर करावा.
- चहा पिण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे तो जेवणा अगोदर किंवा जेवण झाल्यानंतर काही तासांनी घ्यावा.
Disclaimer:- ह्या लेखामध्ये दिली गेलेली माहिती शैक्षणिक उद्देशाने सांगितली गेलेली आहे.तरीही कोणताही व्यायाम किंवा उपचार करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
Heart Attack होण्याच्या आधी डाव्या हाताला का दुखायला सुरुवात होते?
Male Breast Cancer: पुरुषांमध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरच प्रमाण का वाढतंय?
Health Tips In Winter: ह्या 5 गोष्टी करा,ज्या तुम्हाला हिवाळ्यात आजारापासून दूर ठेवतील.